कुरेशींच्या कुटुंबामागे संपूर्ण भारत खंबीरपणे उभा   

वडोदरा येथील रोड शोमध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी 

वडोदरा : भारताच्या ऑपशन सिंदूर नंतर कर्नल सोफिया कुरेशी हे नाव चर्चेत होते.ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया ब्रीफिंगचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी भारताच्या सीमेवरील नारीशक्तीचे प्रतीक आहेत. आता पुन्हा त्या आणि त्यांचे कुटुंब चर्चेत आहेत. 
 
सोमवारी गुजरातमधील वडोदरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.कर्नल सोफिया कुरेशी यांचे वडील ताज मोहम्मद,आई हलिमा कुरेशी,भाऊ संजय कुरेशी आणि जुळी बहीण शायना सुनसारा यांच्यासह हजारो नागरिक पंतप्रधानांचे आगमनाही वाट बघत होते.त्यांच्या सन्मानार्थ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी हर्नी विमानतळाजवळ लोकांनी 
 
पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत झाले, त्यांच्या रोड शोच्या मार्गावर हजारो लोक स्वागतासाठी रांगेत उभे होते.उपस्थित नागरिक  "भारत माता की जय", आणि "वंदे मातरम" च्या  घोषणा देत होते,'सिंदूर सन्मान यात्रेत' सहभागी होत होते. यासोबतच पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. 
 
माझी बहीण आता देशाची बहीण : शायना सुनसारा
 
या यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना, कर्नल कुरेशी यांची बहीण शायना सुनसारा म्हणाल्या "पंतप्रधान मोदींना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. त्यांना भेटणे हा एक मोठा सन्मान होता. जेव्हा त्यांनी रोड शो केला तेव्हा तो एक अभिमानाचा क्षण होता. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी खूप काही केले आहे. पंतप्रधानांना भेटणे हा एक वेगळाच आनंददायी अनुभव होता."
 
कर्नल सोफिया यांच्याबद्दल बोलताना,"कर्नल सोफिया कुरेशी ही माझी जुळी बहीण आहे. ती माझ्यापेक्षा १५ मिनिटांनी मोठी आहे. जेव्हा तुमची बहीण देशासाठी काही करते तेव्हा ते केवळ तुम्हालाच नाही तर इतरांनाही प्रेरणा देते. ती आता फक्त माझी बहीण नाही तर देशाची बहीण आहे." अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Related Articles